राज्यात चार कोटी दोन लाखांहून अधिक जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:05 AM2021-07-23T04:05:28+5:302021-07-23T04:05:28+5:30
मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात एक लाख सहा हजार १९० जणांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण चार कोटी दोन ...
मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात एक लाख सहा हजार १९० जणांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण चार कोटी दोन लाख १७ हजार ५२२ जणांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील एक कोटी ३५ लाख सात हजार १०७ जणांनी लस घेतली आहे.
राज्यात १२ लाख ८४ हजार ७०६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर आठ लाख ८८ हजार ३५२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ११ हजार ८२२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर दहा लाख ७१ हजार १७३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ४५हून अधिक वय असणाऱ्या एक कोटी ७४ लाख ८९ हजार २७ जणांनी लसीचा पहिला डोस, तर ७० लाख १५ हजार ३३६ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
जिल्हा लाभार्थी
मुंबई- ६७,९८,२०३
ठाणे - ३१,४३,५८१
पुणे- ५७,०४,६३१
नागपूर- २१,७६,९५७