राज्यात १ कोटी १ लाख ९९ हजार ३६७ जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:06 AM2021-04-13T04:06:35+5:302021-04-13T04:06:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणात एक कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत १ कोटी १ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणात एक कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत १ कोटी १ लाख ९९ हजार ३६७ जणांना लस देण्यात आली आहे, तर रविवारी २ लाख २३ हजार ७५३ लाभार्थ्यांना लस दिल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मुंबईत आतापर्यंत १६ लाख ७१ हजार ७५८, पुण्यात १४ लाख ३७ हजार २९६, ठाण्यात ७ लाख ३७ हजार १९३, नागपूरमध्ये ७ लाख ११ हजार ३७४, नाशिकमध्ये ४ लाख ५४ हजार ४८५ जणांनी लस घेतली. मुंबईत आतापर्यंत १ लाख ७९ हजार ६९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ९१,०६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १ लाख ७७ हजार ४६९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ८२,७६७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. याशिवाय ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ११ लाख २१ हजार ५८७ लाभार्थ्यांना पहिला, तर १९ हजार १७७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.
.....................