राज्यात १ कोटी ३२ लाख नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:08 AM2021-04-23T04:08:04+5:302021-04-23T04:08:04+5:30
मुंबई : राज्यात बुधवारी ३ हजार २२७ व्या लसीकरण सत्रात दिवसभरात ३ लाख १८ हजार ११४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात ...
मुंबई : राज्यात बुधवारी ३ हजार २२७ व्या लसीकरण सत्रात दिवसभरात ३ लाख १८ हजार ११४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत एकूण १ कोटी ३२ लाख ९० हजार ९६३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंत १० लाख ७८ हजार ४७१ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ५ लाख ६२ हजार ३६४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ११ लाख ६७ हजार ४३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३ लाख ९५ हजार ५८१ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या ९४ लाख ५६ हजार ७४९ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ६ लाख ३० हजार ७५५ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
आतापर्यंत मुंबईत २१ लाख २४ हजार ७८६, पुण्यात १९ लाख १६ हजार ९३१, ठाण्यात १० लाख १ हजार ५३, नागपूरमध्ये ८ लाख ४० हजार ९९२, नाशिकमध्ये ५ लाख ८७ हजार २३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.