१२ कोटींच्या राज्यात १४ कोटी जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 07:21 AM2022-01-14T07:21:08+5:302022-01-14T07:21:13+5:30
राज्यात १२ लाख ९४ हजार ६३५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ११ लाख ७५ हजार ५३ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला.
मुंबई : राज्यातील एकूण लोकसंख्या १२ कोटींच्या घरात असताना आतापर्यंत राज्यात एकूण १४ कोटी १५ लाख ६९ हजार ४६९ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. राज्यात ८ कोटी ४२ लाख २७ हजार ९४६ जणांना पहिला डोस, तर ५ कोटी ७१ लाख ७० हजार ३६ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ४ कोटी ७२ लाख ४१ हजार ७२५ जणांनी पहिला, तर ३ कोटी ५ लाख ७७ हजार ५९८ जणांनी दुसरा डोस घेतला. राज्यात ४५-५९ वयोगटातील १ कोटी ८१ लाख ११ हजार ७६६ जणांनी पहिला, तर १ कोटी ३७ लाख ७४ हजार ६८० जणांनी दुसरा डोस घेतला.
राज्यात १२ लाख ९४ हजार ६३५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ११ लाख ७५ हजार ५३ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. २१ लाख ४८ हजार ६२१ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी पहिला तर, १९ लाख ६९ हजार २६६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. आतापर्यत ८१ हजार ८५५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी तर, ४९ हजार ८०२ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दक्षता मात्रा घेतली आहे. तर ६० हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ३१ लाख २८ हजार १५९ जणांनी पहिला, तर ९६ लाख ७३ हजार ३४९ जणांनी दुसरा डोस घेतला. तसेच, आतापर्यंत ३९,८३० जणांनी दक्षता मात्रा घेतली आहे. राज्यात १५ ते १८ वयोगटातील २३ लाख ३ हजार ४० जणांना लस देण्यात आली आहे.