राज्यात १ कोटी ४० लाख नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:29+5:302021-04-25T04:06:29+5:30

मुंबई : राज्यात शुक्रवारी ३ हजार ५३१व्या लसीकरण सत्रात दिवसभरात ३ लाख ३ हजार ३९९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, ...

Vaccination of 14 million citizens in the state | राज्यात १ कोटी ४० लाख नागरिकांचे लसीकरण

राज्यात १ कोटी ४० लाख नागरिकांचे लसीकरण

Next

मुंबई : राज्यात शुक्रवारी ३ हजार ५३१व्या लसीकरण सत्रात दिवसभरात ३ लाख ३ हजार ३९९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ४० लाख २४२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत १६ लाख ५७ हजार ७०१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे तर १६ लाख २३ हजार ८६९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात ४५ ते ५९ दरम्यान वय असणाऱ्या ५० लाख ३ हजार ३७० लाभार्थ्यांचे तर ६० हून अधिक वय असणाऱ्या ५७ लाख १५ हजार ३०२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

आतापर्यंत मुंबईत २२ लाख १२ हजार १०५, पुण्यात २० लाख ३० हजार ४७८, ठाण्यात १० लाख ५३ हजार ३३१, नागपूरमध्ये ८ लाख ६९ हजार २९, नाशिकमध्ये ६ लाख २७ हजार ६७४ जणांना लस देण्यात आली.

.............................

Web Title: Vaccination of 14 million citizens in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.