मुंबई – राज्यात मंगळवारी १ लाख ९३ हजार ९१ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी १२ लाख ४७ हजार १३३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ७ लाख ४९ हजार ८३२ लाभार्थ्यांना लस दिली आहे.
राज्यात ११ लाख ६८ हजार १३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ७ लाख २४ हजार ५५१ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १६ लाख ९० हजार १७० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ७ लाख ५२ हजार ९८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १३ लाख २१ हजार ७६१ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस तर २९ लाख ५० हजार ६९९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
राज्यात मुंबईत ३० लाख ९६ हजार २८२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्याखालोखाल पुण्यात २६ लाख ८० हजार ८९४, ठाण्यात १५ लाख ९६ हजार ३५९, नागपूरमध्ये १२ लाख ६५ हजार १६४, नाशिकमध्ये ९ लाख ५० हजार ९०१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.