राज्यात २ कोटी १९ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:06 AM2021-05-30T04:06:33+5:302021-05-30T04:06:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शुक्रवारी २ लाख ६९ हजार २६३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ...

Vaccination to 2 crore 19 lakh beneficiaries in the state | राज्यात २ कोटी १९ लाख लाभार्थ्यांना लस

राज्यात २ कोटी १९ लाख लाभार्थ्यांना लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शुक्रवारी २ लाख ६९ हजार २६३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी १९ लाख १३ हजार ८३७ जणांचे लसीकरण करण्यात आले.

राज्यात १९ लाख १ हजार ७५१ आरोग्य कर्मचाऱ्यांना, तर २५ लाख ३ हजार ९९३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्या खालोखाल १८ ते ४४ वयोगटातील ८ लाख ८५ हजार ३१३ लाभार्थ्यांचे, तर ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६६ लाख २२ हजार ७७२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

मुंबईत आतापर्यंत एकूण ३२ लाख १४ हजार ५८५, पुण्यात २७ लाख ६० हजार ३५८, ठाण्यात १६ लाख ६३ हजार २३१, तर नागपूरमध्ये १२ लाख ७५ हजार ६६३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

...........................................................................

Web Title: Vaccination to 2 crore 19 lakh beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.