Join us

राज्यात २ कोटी १९ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शुक्रवारी २ लाख ६९ हजार २६३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शुक्रवारी २ लाख ६९ हजार २६३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी १९ लाख १३ हजार ८३७ जणांचे लसीकरण करण्यात आले.

राज्यात १९ लाख १ हजार ७५१ आरोग्य कर्मचाऱ्यांना, तर २५ लाख ३ हजार ९९३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्या खालोखाल १८ ते ४४ वयोगटातील ८ लाख ८५ हजार ३१३ लाभार्थ्यांचे, तर ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६६ लाख २२ हजार ७७२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

मुंबईत आतापर्यंत एकूण ३२ लाख १४ हजार ५८५, पुण्यात २७ लाख ६० हजार ३५८, ठाण्यात १६ लाख ६३ हजार २३१, तर नागपूरमध्ये १२ लाख ७५ हजार ६६३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

...........................................................................