Join us

राज्यात २ कोटी २३ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात ८४ हजार ४३० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण २ कोटी २३ लाख ६ ...

मुंबई : राज्यात दिवसभरात ८४ हजार ४३० लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण २ कोटी २३ लाख ६ हजार ९९८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ११ लाख ८० हजार ७६४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ७ लाख ३० हजार ४३ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १७ लाख ७१ हजार १६५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ७ लाख ६५ हजार ३०३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ३९ लाभार्थ्यांनी पहिला, तर ५९ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ३८ लाख २२ हजार ४३९ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३० लाख ३६ हजार ८३६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

मुंबईत आतापर्यंत एकूण ३२ लाख ९८ हजार १०५, पुण्यात २८ लाख १२ हजार ६६६, ठाण्यात १६ लाख ९० हजार ६८२, नागपूरमध्ये १२ लाख ८० हजार ८५९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.