राज्यात २ कोटी २८ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:27+5:302021-06-03T04:06:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात २ लाख ५१ हजार ७०३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत ...

Vaccination of 2 crore 28 lakh beneficiaries in the state | राज्यात २ कोटी २८ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

राज्यात २ कोटी २८ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात २ लाख ५१ हजार ७०३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण २ कोटी २८ लाख ७२ हजार ७८८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यात ११ लाख ९४ हजार ७९८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख ३६ हजार ११२ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १८ लाख ६ हजार ५१७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख ७५ हजार ९०२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील ११ लाख ७४ हजार ५०६ लाभार्थ्यांना पहिला, तर ३७७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. याचप्रमाणे ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ४० लाख ७५ हजार ११४ लाभार्थ्यांना पहिला, तर ३१ लाख ९ हजार ४६२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

मुंबईत आतापर्यंत ३४ लाख ५० हजार ६९४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याखालोखाल पुण्यात २८ लाख ९१ हजार ३९०, ठाण्यात १७ लाख १२ हजार ४०२, नागपूरमध्ये १२ लाख ९२ हजार २५९, नाशिकमध्ये १० लाख ४ हजार २७६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.

.......................................

Web Title: Vaccination of 2 crore 28 lakh beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.