Join us

राज्यात २ कोटी २८ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात २ लाख ५१ हजार ७०३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात २ लाख ५१ हजार ७०३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण २ कोटी २८ लाख ७२ हजार ७८८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यात ११ लाख ९४ हजार ७९८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख ३६ हजार ११२ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १८ लाख ६ हजार ५१७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख ७५ हजार ९०२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील ११ लाख ७४ हजार ५०६ लाभार्थ्यांना पहिला, तर ३७७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. याचप्रमाणे ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ४० लाख ७५ हजार ११४ लाभार्थ्यांना पहिला, तर ३१ लाख ९ हजार ४६२ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

मुंबईत आतापर्यंत ३४ लाख ५० हजार ६९४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याखालोखाल पुण्यात २८ लाख ९१ हजार ३९०, ठाण्यात १७ लाख १२ हजार ४०२, नागपूरमध्ये १२ लाख ९२ हजार २५९, नाशिकमध्ये १० लाख ४ हजार २७६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.

.......................................