Join us

राज्यातील २ कोटी ३७ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शुक्रवारी ३ लाख ७२ हजार ५२८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शुक्रवारी ३ लाख ७२ हजार ५२८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ३७ लाख ७ हजार ७५८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात १२ लाख ४ हजार ७५४ आराेग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख ४३ हजार ५९६ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात १८ लाख ५१ हजार ७४० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख ८६ हजार ४९९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १५ लाख ७ हजार ६०५ लाभार्थ्यांना पहिला, तर १२,१०० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ४४ लाख १० हजार २२२ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर ३१ लाख ९१ हजार २४२ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत ३६ लाख ३५ हजार ३५५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्याखालोखाल पुण्यात ३० लाख ५० हजार ३१९, नागपूरमध्ये १३ लाख १२ हजार १८४, ठाण्यात १७ लाख ७४ हजार ६९१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

......................................................