राज्यात २ कोटी ५९ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:06+5:302021-06-16T04:08:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात ८८ हजार १३४ लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण २ कोटी ५९ लाख ...

Vaccination to 2 crore 59 lakh beneficiaries in the state | राज्यात २ कोटी ५९ लाख लाभार्थ्यांना लस

राज्यात २ कोटी ५९ लाख लाभार्थ्यांना लस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात रविवारी दिवसभरात ८८ हजार १३४ लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण २ कोटी ५९ लाख ९ हजार ७८ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली.

राज्यात १२ लाख २४ हजार ४ हजार ९० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ७ लाख ८८ हजार ३५९ आराेग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. १९ लाख ६२ हजार ३०८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला तर ८ लाख २८ हजार ३३१ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील २३ लाख ९३ हजार ८८६ लाभार्थ्यांना पहिला डोस तर १ लाख ७९ हजार २८३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

राज्यात ४५हून अधिक वयोगटातील १ कोटी ५१ लाख ४७ हजार ७३६ लाभार्थ्यांना पहिला, तर ३३ लाख ८५ हजार ८५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत ४१ लाख ९८ हजार ९५ लाभार्थ्यांना, पुण्यात ३४ लाख ३ हजार ६७३ लाभार्थ्यांना, ठाण्यात १९ लाख ७१ हजार ७५७ लाभार्थ्यांना आणि नागपूरमध्ये १३ लाख ५७ हजार ६२० लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

.................................................................

Web Title: Vaccination to 2 crore 59 lakh beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.