राज्यात २ कोटी ६२ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:13+5:302021-06-16T04:08:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सोमवारी २ लाख ९२ हजार १४० लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत २ ...

Vaccination to 2 crore 62 lakh beneficiaries in the state | राज्यात २ कोटी ६२ लाख लाभार्थ्यांना लस

राज्यात २ कोटी ६२ लाख लाभार्थ्यांना लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सोमवारी २ लाख ९२ हजार १४० लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत २ कोटी ६२ लाख २८ हजार ४५१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यात १२ लाख २९ हजार ३४१ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ७ लाख ९२ हजार ४ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १९ लाख ८३ हजार १७६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ८ लाख ३३ हजार २८५ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यातील १८ ते ४४ वयोगटांतील २४ लाख ९८ हजार ८५५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला, तर १ लाख ९२ हजार ४९४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

अशाच प्रकारे राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ५२ लाख ८३ हजार ९९२ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, ३४ लाख १५ हजार ३०४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. मुंबईत ४२ लाख ७९ हजार ७३० लाभार्थ्यांना, पुण्यात ३४ लाख ४७ हजार ५८१ लाभार्थ्यांना ठाण्यात २० लाख ५ हजार ३२२ लाभार्थ्यांना आणि नागपूरमध्ये १३ लाख ६३ हजार ७३ लाभार्थ्यांचे लस देण्यात आली.

..........................................

Web Title: Vaccination to 2 crore 62 lakh beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.