Join us

राज्यात दोन कोटी ६७ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात दोन लाख ३४ हजार ३५८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे; तर आतापर्यंत २ कोटी ६७ ...

मुंबई : राज्यात दिवसभरात दोन लाख ३४ हजार ३५८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे; तर आतापर्यंत २ कोटी ६७ लाख २० हजार १७ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील २६ लाख ९४ हजार ७३० लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस २ लाख ११ हजार ४०९ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात १२ लाख ३५ हजार ९२८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर आठ लाख २ हजार ९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. २० लाख ९ हजार ९१८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर आठ लाख ४३ हजार ३७८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या एक कोटी ५४ लाख ५१ हजार ४०८ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे; तर ३४ लाख ७१ हजार १५४ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

मुंबईत ४४ लाख १७ हजार १२२ लाभार्थ्यांना, पुण्यात ३५ लाख ४० हजार ५३९ लाभार्थ्यांना ठाण्यात २० लाख ५८ हजार ६२४ लाभार्थ्यांना आणि नागपूरमध्ये १३ लाख ७३ हजार ११५ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले आहे.