Join us

राज्यात २ कोटी ७५ लाख लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ३ लाख ८१ हजार ३५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ...

मुंबई : राज्यात शनिवारी दिवसभरात ३ लाख ८१ हजार ३५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ७५ लाख ७६ हजार १७७ लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात १२ लाख ४५ हजार ३८२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ८ लाख ११ हजार ८४७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. २० लाख ५० हजार ६६ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ८ लाख ६० हजार १९३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ३० लाख ९५ हजार ५३५ लाभार्थ्यांना पहिला आणि २ लाख २८ हजार ५९५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ५७ लाख ८ हजार ८७७ लाभार्थ्यांना पहिला डोस तर ३ लाख ५७ हजार ६८२ लाभार्थ्यांना दुसरा डाेस देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत ४६ लाख २३ हजार ३०३ लाभार्थ्यांना, पुण्यात ३७ लाख २५ हजार ८४४ लाभार्थ्यांना, ठाण्यात २१ लाख ४८ हजार ३२५ लाभार्थ्यांना आणि नागपूरमध्ये १४ लाख ३ हजार २८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

.............................