CoronaVaccination: राज्यात २ कोटी ८६ लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:06 AM2021-06-24T11:06:40+5:302021-06-24T11:10:06+5:30

राज्यात १२ लाख ५४ हजार ५७७ आराेग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर ८ लाख २०,०११ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला.

Vaccination to 2 crore 86 lakh beneficiaries in the state | CoronaVaccination: राज्यात २ कोटी ८६ लाख लाभार्थ्यांना लस

CoronaVaccination: राज्यात २ कोटी ८६ लाख लाभार्थ्यांना लस

Next

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात ५ लाख ५८ हजार ६३९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत एकूण २ कोटी ८६ लाख ४५ हजार ७५३ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आलीहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ३७ लाख ८८ हजार ५५९ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला, तर २ लाख ३७ हजार ४८८ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ५४ हजार ५७७ आराेग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर ८ लाख २०,०११ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. २० लाख ७१ हजार ११८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी पहिला, तर ८ लाख ७४ हजार ८१२ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. 

Web Title: Vaccination to 2 crore 86 lakh beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.