Join us

राज्यात २ कोटी ३० लाख लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात २ लाख १६ हजार ३०२ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ३० ...

मुंबई : राज्यात दिवसभरात २ लाख १६ हजार ३०२ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ३० लाख ९९ हजार २० लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ११ लाख ९७ हजार ३९७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ७ लाख ३७ हजार ७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर १८ लाख १७ हजार १०४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि ७ लाख ७९ हजार ५४० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील १२ लाख ७६ हजार २०३ लाभार्थ्यांना पहिला डोस व १ हजार ६६३ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात ४५ हून अधिक वयोगटातील १ कोटा ४१ लाख ५१ हजार ८४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे, तर ३१ लाख ३८ हजार ३१५ लाभार्थ्यांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.