राज्यात दिवसभरात २३ हजार ७२१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:07 AM2021-02-10T04:07:19+5:302021-02-10T04:07:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात पार पडलेल्या ५१५ लसीकरण सत्रात एकूण २३,७२१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ...

Vaccination of 23 thousand 721 employees in the state during the day | राज्यात दिवसभरात २३ हजार ७२१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण

राज्यात दिवसभरात २३ हजार ७२१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात पार पडलेल्या ५१५ लसीकरण सत्रात एकूण २३,७२१ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १२,३४३ आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच ११,३७८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. यात २३,५६८ लाभार्थ्यांना कोविशिल्ड, तर १५३ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली.

राज्यात आतापर्यंत एकूण ५,३६,१९७ लाभार्थ्यांचे कोविड लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. मुंबई उपनगरात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण झाल्याची नोंद आहे. येथे मंगळवारी दिवसभरात एक हजार ९१९ आरोग्य कर्मचाऱ्यांना, तर एक हजार ६४५ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत मुंबई उपनगरात ५२ हजार ५९६ आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि तीन हजार ५६४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, तर शहरात दिवसभरात ८१८ आरोग्य कर्मचाऱ्यांना व ६७३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबईत एकूण २५ हजार ७७१ आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दोन हजार २१४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

राज्यात मुंबईखालोखाल ४७ हजार १८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि १ हजार ९५३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ४९ हजार १३७ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ठाण्यात एकूण ५० हजार २७७ लाभार्थ्यांना, नाशिकमध्ये २३ हजार ९७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

सर्वांत कमी लसीकरण असलेले जिल्हे

जिल्हा - लाभार्थी

हिंगोली - ३ हजार ९४५

सातारा - ४ हजार ४०४

परभणी - ४ हजार ९३१

वाशिम - ४ हजार ५६५

...................

Web Title: Vaccination of 23 thousand 721 employees in the state during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.