राज्यात ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:06 AM2021-06-27T04:06:09+5:302021-06-27T04:06:09+5:30

मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर आतापर्यंत राज्यात एकूण ...

Vaccination to 3 crore 9 lakh 79 thousand 460 beneficiaries in the state | राज्यात ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लाभार्थ्यांना लस

राज्यात ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लाभार्थ्यांना लस

Next

मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ७ लाख २६ हजार ५८८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, तर आतापर्यंत राज्यात एकूण ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

शुक्रवारपर्यंत राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील ४९ लाख ५७ हजार ६८५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३८ लाख ४४ हजार ७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ६७ हजार ७७१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख २९ हजार ३१४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २० लाख ८४ हजार ३६२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख ९६ हजार ९५० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६१ लाख ४७ हजार ५३८ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३८ लाख ४४ हजार ७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Web Title: Vaccination to 3 crore 9 lakh 79 thousand 460 beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.