राज्यात ३ कोटी ९९ लाख जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:05 AM2021-07-21T04:05:52+5:302021-07-21T04:05:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात ३ लाख ९६ हजार ६२० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सोमवारी दिवसभरात ३ लाख ९६ हजार ६२० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ३ कोटी ९९ लाख १२ हजार २४५ जणांचे लसीकरण झाले आहे.
मुंबईत आतापर्यंत ६७ लाख ४० हजार २५८, पुण्यात ५६ लाख ६४ हजार ५२५, ठाण्यात ३१ लाख २० हजार ११८, नागपूरमध्ये २१ लाख ५४ हजार ९४६ जणांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात १२ लाख ८४ हजार ४३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ८ लाख ८५ हजार ९८२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ११ हजार ४० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १० लाख ६३ हजार २२१ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ९७ लाख ८९ हजार ४६२ जणांनी लसीचा पहिला डोस, तर ४ लाख १५ हजार ८० जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ७४ लाख ५१ हजार ९०४ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ६ लाख ९१ हजार १२५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.