राज्यात दिवसभरात ३१ हजार ९७६ लाभार्थ्यांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:07 AM2021-02-14T04:07:38+5:302021-02-14T04:07:38+5:30

मुंबई : राज्यात ६९२ लसीकरण सत्रात दिवसभरात एकूण ३१,९७६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १३,२९० आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच १८,६८६ ...

Vaccination of 31 thousand 976 beneficiaries in a day in the state | राज्यात दिवसभरात ३१ हजार ९७६ लाभार्थ्यांना लसीकरण

राज्यात दिवसभरात ३१ हजार ९७६ लाभार्थ्यांना लसीकरण

Next

मुंबई : राज्यात ६९२ लसीकरण सत्रात दिवसभरात एकूण ३१,९७६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी १३,२९० आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच १८,६८६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात ३१,८२८ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने लसीकरण करण्यात आले आहे आणि १४८ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले.

राज्यात आतापर्यंत एकूण ६,८३,००४ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ५,६७२ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण मुंबईत झाले असून लाभार्थ्यांची संख्या १ लाख ९ हजार ८३ आहे. तर त्याखालोखाल ठाणे ६६ हजार २६४ आणि पुण्यात ६२ हजार ८८७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

तर राज्यात सर्वांत कमी प्रतिसाद वाशिम जिल्ह्यात असून लाभार्थ्यांची संख्या ५ हजार ४१४ आहे. तर त्यानंतर परभणी येथे ५ हजार ८६७ , हिंगोली ५ हजार ४९, उस्मानाबाद येथे ६ हजार ८८६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

---------------------

Web Title: Vaccination of 31 thousand 976 beneficiaries in a day in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.