Join us

राज्यात दिवसभरात ५३ हजार ७१२ लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:07 AM

मुंबई : राज्यात गुरुवारी पार पडलेल्या ८०६व्या लसीकरण सत्रात दिवसभरात ५३ हजार ७१२ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, २८ ...

मुंबई : राज्यात गुरुवारी पार पडलेल्या ८०६व्या लसीकरण सत्रात दिवसभरात ५३ हजार ७१२ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी, २८ हजार २८० जणांना पहिला डोस व २५ हजार ४३२ जणांना दुसरा डाेस देण्यात आला. ७ हजार ६९३ आरोग्य कर्मचाऱ्यांना व २० हजार ५८७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले.

राज्यात २५ हजार ४३२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ५२ हजार ६७१ जणांना कोविशिल्ड, तर १ हजार ४१ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण ११ लाख ४० हजार ८२० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे अग्रक्रमी

राज्यात सर्वाधिक लसीकऱण मुंबईत झाले असून लाभार्थ्यांची एकूण संख्या २ लाख ३ हजार ४४४ झाली आहे. त्याखालोखाल पुण्यात १ लाख १५ हजार २३५ लाभार्थ्यांनी, तर ठाण्यात १ लाख २ हजार ७७५ लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. नाशिकमध्ये ५० हजार ८२०, सातारा ४३ हजार ७३५ आणि नागपूरमध्ये ५३ हजार ६३२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.