Join us

राज्यात आतापर्यंत ६८ लाख नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शुक्रवारी एकूण ३ लाख २८ हजार १९५ नागरिकांना लस देण्यात आली. त्यात २ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शुक्रवारी एकूण ३ लाख २८ हजार १९५ नागरिकांना लस देण्यात आली. त्यात २ लाख ९५ हजार ५५२ लाभार्थ्यांना कोविशिल्ड, तर २९,६४३ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ६८ लाख ८४ हजार ६९४ जणांनी कोविड लस घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत आतापर्यंत १२ लाख ६८ हजार १४८, पुण्यात ८ लाख ९७ हजार ७६६, ठाण्यात ५ लाख १ हजार ६२७, नागपूरमध्ये ४ लाख २५ हजार ९५७, नाशिमध्ये २ लाख ९६ हजार ४६२ जणांना लस देण्यात आली. मुंबईत शुक्रवारी ५७,३९० जणांना लस देण्यात आली. त्यातील ५५,१०६ जणांना पहिला, तर २,२८४ जणांंना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण १२ लाख ६६ हजार ३८७ जणांना लस देण्यात आली. त्यात ११ लाख ०९ हजार ९३१ जणांना पहिला, तर १ लाख ५६ हजार ४५६ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण २ लाख ४९ हजार ९२६ आरोग्य कर्मचारी, २ लाख ५९ हजार ७०७ फ्रंटलाईन वर्कर्स, ५ लाख ७६ हजार ६८८ ज्येष्ठ नागरिक, तर ४५ ते ५९ वयाेगटातील गंभीर आजार असलेल्या १ लाख ८० हजार ६६ जणांना लस देण्यात आली.

.................