राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील ७ लाख ८२ हजार लाभार्थ्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:00+5:302021-05-29T04:06:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारी २ लाख ८० हजार ७५६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी २ लाख ८० हजार ७५६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण २ कोटी १६ लाख ४० हजार १४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील ७ लाख ८२ हजार ३०१ जणांना लस देण्यात आली.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात मुंबई आघाडीवर असून, एकूण १ लाख ५७ हजार ७८१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्याखालोखाल पुण्यात ८९ हजार ६७७, ठाण्यात ८० हजार ५८७, रायगड २७ हजार ६१७, रत्नागिरी २६ हजार २९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात १८ लाख ८८ हजार ७३२ आरोग्य कर्मचाऱ्यांचे, २४ लाख ४९ हजार ४९७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे, तर ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६२ लाख ३१ हजार ८०२ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.