राज्यात ९ लाख ८३ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:09 AM2021-02-23T04:09:44+5:302021-02-23T04:09:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सोमवारी पार पडलेल्या ८२३ लसीकरण सत्रात एकूण ५७ हजार ३६७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात ...

Vaccination of 9 lakh 83 thousand beneficiaries in the state | राज्यात ९ लाख ८३ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

राज्यात ९ लाख ८३ हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सोमवारी पार पडलेल्या ८२३ लसीकरण सत्रात एकूण ५७ हजार ३६७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३६ हजार १८२ लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे व २१ हजार १८५ लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. त्यात १० हजार ९४७ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना व २५ हजार २३५ फ्रंटलाईन कर्मचारी लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले.

२१ हजार १८५ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ५५ हजार ८६० लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने लसीकरण करण्यात आले आहे. १ हजार ५०७ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीने लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ९ लाख ८३ हजार ८३० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले.

राज्यात सर्वाधिक लसीकरण मुंबईत झाले असून लाभार्थ्यांची संख्या १ लाख ७४ हजार ७२० इतकी आहे ; त्या खालोखाल पुण्यात ९५ हजार २५८ आणि ठाण्यात ९१ हजार ६१५ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. राज्यात लसीकरणाला सर्वात कमी प्रतिसाद हिंगोलीत असून या ठिकाणी ६ हजार ४६३ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. त्यानंतर वाशिम ७ हजार ६८१ आणि सिंधुदुर्ग ८ हजार ७७२ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.

Web Title: Vaccination of 9 lakh 83 thousand beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.