महाराष्ट्र दिनी लसीकरणाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:04 AM2021-05-02T04:04:31+5:302021-05-02T04:04:31+5:30

पुण्यात दिवसभरात सर्वाधिक लसीकरण; मुंबई दुसऱ्या क्रमांकावर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शनिवारी महाराष्ट्र दिनी १८ ते ४४ ...

Vaccination begins on Maharashtra Day | महाराष्ट्र दिनी लसीकरणाला सुरुवात

महाराष्ट्र दिनी लसीकरणाला सुरुवात

Next

पुण्यात दिवसभरात सर्वाधिक लसीकरण; मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शनिवारी महाराष्ट्र दिनी १८ ते ४४ वर्षे वयोगटांतील लसीकरणाला सुरुवात करण्याचा मुहूर्त राज्य शासनाने साधला आहे. दिवसभरात २६ जिल्ह्यांत ठरावीक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होते. त्याद्वारे एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

राज्यात सर्वाधिक लसीकरण पुण्यात झाले असून, लाभार्थ्यांची संख्या १ हजार ३०६ इतकी आहे. त्या खालोखाल मुंबईत १,००४, पालघर ७००, परभणीत ८०४, तर ठाण्यात ६११ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात सर्वांत कमी लसीकरणाची नोंद गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात झाले असून, येथील लाभार्थ्यांची संख्या अनुक्रमे ८३, ९० आहे.

राज्यात लसीकरणासाठी मर्यादित लसींचा साठा असला, तरी पहिल्याच दिवशी सरकारी, पालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर लाभार्थ्यांची गर्दी झालेली दिसून आली. नोंदणीनंतरच लस मिळेल, असे स्पष्ट केले असतानाही बऱ्याच लसीकरण केंद्रांवर उत्सुक लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला उर्वरित जिल्ह्यांमध्ये २ मेपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोविशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.

जिल्हा लाभार्थी

अहमदनगर २५२

अमरावती ३००

औरंगाबाद ४००

बीड २२६

भंडारा ४८५

बुलडाणा ३६८

धुळे ३२५

गडचिरोली ८३

हिंगोली १५७

जळगाव ४११

जालना ३५३

कोल्हापूर ३२१

लातूर ५९३

मुंबई १,००४

नागपूर २५२

नांदेड २८८

नंदूरबार १४४

नाशिक २४७

पालघर ७००

परभणी ८४६

पुणे १,३१६

सांगली ६९५

सातारा ५२८

सोलापूर ४९७

ठाणे ६११

यवतमाळ ९०

एकूण ११,४९२

Web Title: Vaccination begins on Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.