लसीकरण मोहिमेने ओलांडला ७८ लाखांचा टप्पा, आरोग्य विभागाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:09 AM2018-12-06T06:09:15+5:302018-12-06T06:09:27+5:30

गोवर-रुबेला लसीकरणामुळे देशातील ४० टक्के बाल व माता मृत्युदर यामुळे घटणार आहे.

Vaccination campaign exceeds 78 lakhs, health department claims | लसीकरण मोहिमेने ओलांडला ७८ लाखांचा टप्पा, आरोग्य विभागाचा दावा

लसीकरण मोहिमेने ओलांडला ७८ लाखांचा टप्पा, आरोग्य विभागाचा दावा

Next

मुंबई : गोवर-रुबेला लसीकरणामुळे देशातील ४० टक्के बाल व माता मृत्युदर यामुळे घटणार आहे. यातून भावी पिढी सुरक्षित व आरोग्यपूर्ण राहावी, यासाठी प्रत्येक बालकाला ही लस देणे आवश्यक आहे. त्यामुळे आजार होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या प्रत्येक पाल्याला गोवर व रुबेलाविरोधी लसीकरण द्यावे. कोणतेही गैरसमज न बाळगता,
९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या
बालकांना लस देण्यात यावी, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या लसीकरणाने ७८ लाखांचा टप्पा गाठला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून दक्षिण-पूर्व आशियामध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान, २०२० पर्यंत गोवर व रुबेला देशातून हद्दपार करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. राज्यात लसीकरणाच्या माध्यमातून २०२० पर्यंत गोवर-रुबेला हद्दपार करण्यासाठी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने या मोहिमेचे आयोजन केले आहे. गोवर-रुबेलाची लस गेल्या ४० वर्षांपासून जगातील १४९ देशांमध्ये वापरली जात आहे.
राज्यात सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांना लसीकरण देण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्यासाठी एनएम, आशा व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये व त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या दवाखान्यांद्वारे आणि बाह्यसंपर्क लसीकरण सत्राद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
।‘सुमारे २ कोटी बालकांचे प्राण वाचले
२०१५ मध्ये जगभरात जवळपास १.३५ लक्ष मृत्यू हे केवळ गोवरमुळे झाले आहेत. म्हणजे रोज ३६७ मृत्यू किंवा दर तासाला १४ मृत्यू जगभरात गोवरमुळे होतात. गोवर लसीकरणामुळे सन २००० ते २०१५ या कालावधीत जगभरात गोवरमुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ७९ टक्क्यांपर्यंत कमी झाले. २०१६ सालच्या जागतिक आकडेवारीनुसार गोवरमुळे होणाऱ्या मृत्युंपैकी ३७ टक्के मृत्यू हे भारतामध्ये झाले आहेत. गोवरच्या लसीकरणामुळे २००० पासून सन २०१५ पर्यंत सुमारे २ कोटी बालकांचे प्राण वाचले.
।माहिती आॅनलाइन भरा
बºयाच शाळांमध्ये लसीकरणाच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. अनुपस्थित विद्यार्थ्यांना लस दिली जात नाही. त्यामुळे यापुढे लसीकरणाची माहिती केंद्र शासन , जागतिक आरोग्य संघटना याना वेळोवेळी आॅनलाइन मिळावी यासाठी सरल प्रणालीच्या माध्यमातून स्टुडंट पोर्टलवर याची नोंद ठेवण्यात यावी अशी सूचनाही शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Vaccination campaign exceeds 78 lakhs, health department claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.