दिव्यांगांसाठी सुरू झाली लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:08 AM2021-07-14T04:08:18+5:302021-07-14T04:08:18+5:30

मुंबई : दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम सुरू करा, अशी मागणी सातत्याने होत असताना पश्चिम नगरातील प्रभाग क्रमांक ५४ मध्ये दिव्यांगांसाठी ...

Vaccination campaign started for the disabled | दिव्यांगांसाठी सुरू झाली लसीकरण मोहीम

दिव्यांगांसाठी सुरू झाली लसीकरण मोहीम

Next

मुंबई : दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम सुरू करा, अशी मागणी सातत्याने होत असताना पश्चिम नगरातील प्रभाग क्रमांक ५४ मध्ये दिव्यांगांसाठी लसीकरण मोहीम सोमवारपासून सुरू झाली.

नगरसेविका व महिला विभाग संघटक साधना माने यांच्या प्रयत्नाने आणि शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विभागातील दिव्यांग नागरिकांसाठी आधार केंद्र, घास बाजार येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी ३० दिव्यांगांचे येथे लसीकरण करण्यात आले असून येथे रोज दिव्यांगांचे प्रथम प्राधान्य देऊन लसीकरण करावे अशा सूचना डॉक्टर्स व नर्स, कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती साधना माने यांनी दिली. सदर लसीकरण प्रसंगी नगरसेविक साधना माने, शाखाप्रमुख अजित भोगले, शीला राठोड, रवी वर्मा, जितेंद्र महाडिक, चेतन सरपरे, लक्ष्मी गमरे, डॉ. अजय चव्हाण, डॉ सृष्टी उपस्थित होते.

Web Title: Vaccination campaign started for the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.