Join us

मढमध्ये सुरू होणार लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:07 AM

मुंबई : मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक ४९ मधील मढ गावात लसीकरण केंद्र लवकरच सुरू होणार आहे. पी/उत्तर प्रभाग समिती ...

मुंबई : मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक ४९ मधील मढ गावात लसीकरण केंद्र लवकरच सुरू होणार आहे. पी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा व स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार यांनी यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

विभागप्रमुख सुधाकर सुर्वे व महिला विभागसंघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली मढ येथे मुंबई पालिकेतर्फे लसीकरण केंद्र येथील संत बोनाव्हेंचर शाळेत लवकरच सुरू होत आहे. यामुळे मढ ग्रामस्थांना आता लसीकरणासाठी १० ते १५ किमी दूर जावे लागणार नाही.

या लसीकरण केंद्राचे भूमिपूजन नुकतेच मढ चर्चचे फादर गोन्सालो परेरा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पी/उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा संगीता संजय सुतार, समाजसेवक संजय सुतार, मालाड विधानसभा संघटक अनिल भोपी, मालाड विधानसभा प्रभारी किरण कोळी, महिला उपविभाग संघटक जयश्री म्हात्रे, शाखाप्रमुख संदेश घरत, महिला शाखा संघटक संगीता कोळी, श्री हरबादेवी ग्रामदेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील, सुधाकर गुरव, विजय यादव, मोरेश्वर कोळी, कृष्णा कोळी, शिवसैनिक व मढ ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------------------------------------------