प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सुरू झाले लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:07 AM2021-05-27T04:07:02+5:302021-05-27T04:07:02+5:30
--आदित्य ठाकरे मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई-बोरिवली (प.) येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह कोविडमुळे बंदच आहे. त्यामुळे येथील जागेचा ...
--आदित्य ठाकरे
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-बोरिवली (प.) येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह कोविडमुळे बंदच आहे. त्यामुळे येथील जागेचा योग्य वापर करत आता या नाट्यगृहात कोविड लसीकरण केंद्र आजपासून सुरू झाले. नाट्यगृहात लसीकरण केंद्र सुरू होण्याची पश्चिम उपनगरातील पहिलीच घटना आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आमदार, विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या प्रयत्नांनी बोरिवली (प.) प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील लसीकरण केंद्राचे उद्घाटन
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते (दूरदृश्य प्रणालीद्वारे) महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई महापालिका सर्व २२७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करीत आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे प्रतिपादन उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सुरू करण्यात आलेले आर - मध्य विभागातील जम्बो लसीकरण केंद्र असून, जून महिन्यानंतर लस उपलब्ध झाल्यास रोज सुमारे ४०० नागरिकांना येथे लसीकरणाचा लाभ घेता येईल, अशी माहिती आमदार विलास पोतनीस यांनी लोकमतला दिली.
--------------------------------------
----------