आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 42 मधील लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 07:48 PM2021-05-20T19:48:22+5:302021-05-20T19:48:57+5:30

मुंबई-दिंडोशी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 42 मधील मालाड पूर्व कुरार येथील पारेख शाळेतील लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा आज सकाळी  मुंबई उपनगराचे पालक मंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे संपन्न झाला.

Vaccination Center at Ward No 42 by Aditya Thackeray | आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 42 मधील लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 42 मधील लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा

Next

मुंबई-दिंडोशी विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 42 मधील मालाड पूर्व कुरार येथील पारेख शाळेतील लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा आज सकाळी  मुंबई उपनगराचे पालक मंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे संपन्न झाला. तर शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 42 च्या स्थानिक नगरसेविका धनश्री वैभव भरडकर यांनी फीत कापून या लसीकरण केंद्राचे उदघाटन केले. यावेळी मालाड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरडकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे उपस्थित होते.


यावेळी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर,शिवसेना उपनेते सचिन अहिर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालिकेतील गटनेत्या राखी जाधव कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. आगामी पालिका निवडणूक सुमारे नऊ महिन्यांवर आली असतांना विशेष म्हणजे रस्त्यावर अपल्या पक्षाचे झेंडे घेऊन भांडणारे राजकीय नेते आज येथील नागरिकांच्या लसीकरण कार्यक्रमासाठी राजकारण विरहित लसीकरण कार्यक्रम करत एकत्र आले होते.


आगामी पालिका निवडणूक सुमारे नऊ महिन्यांवर आली असतांना विशेष म्हणजे रस्त्यावर अपल्या पक्षाचे झेंडे घेऊन भांडणारे राजकीय नेते आज येथील नागरिकांच्या लसीकरण कार्यक्रमासाठी राजकारण विरहित लसीकरण कार्यक्रम करत एकत्र आले होते.

तिसऱ्या लाटेसाठी आम्ही सज्ज असून मुंबईत चांगली आरोग्य व्यवस्था आणि कोविड सेंटर उभारले आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी कोरोना निमूलनासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पालिकेचे डॉक्टर,नर्स,आरोग्य कर्मचारी यांचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले.

आमदार सुनील प्रभू म्हणाले की,कोरोनाची दुसरी लाट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि महाआघाडी सरकार मधील सर्व मंत्र्यांनी थोपवली आहे. राजकारण विरहित कार्यक्रम उपनगर पालक मंत्री म्हणून आपल्या हस्ते संपन्न व्हावा अशी नगरसेविका धनश्री भरडकर आणि येथील नागरिकांची मागणी होती.

सोमवार, मंगळवार व बुधवारी वॉक ईन पद्धतीने तर गुरुवार,शुक्रवार व शनिवारी ऑनलाईन पद्धतीने येथे लसीकरण होणार आहे. प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयामुळे येथील नागरिकांची मोठी सोय होणार आहे अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी  दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिंडोशी विधानसभा निरीक्षक ताजुदिन इनामदार, माजी नगरसेवक गणपत वारिसे,सुनील गुजर,महिला विधानसभा संघटक पूजा चौहान व रिना सुर्वे, महिला उपविभाग संघटक सानिका शिरगावकर, महिला विधानसभा संघटक पूजा चौहान व रिना सुर्वे, शाखाप्रमुख मोहन परब,अशोक राणे, संजीवनी रावराणे, कृतिका शिर्के, दिंडोशी युवक काँग्रेस अध्यक्ष प्रतिश तिवारी, पी उत्तर वॉर्डच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी ऋतुजा बारस्कर,कार्यकारी अभियंता शिवकांत डोके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title: Vaccination Center at Ward No 42 by Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.