मुंबई : २२ मार्चपासून धारावी येथील नागरी सुविधा केंद्र, ६० फुट रोड (छोटा सायन रुग्णालय ) येथे कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत असून, वय वर्षे ४५ वरील ज्यांना डायबिटीस व इतर आजार आहेत, असे रुग्ण व वय वर्षे ६० पेक्षा जास्त नागरिकांसाठी पूर्वनोंदणी करून लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ही सेवा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळात उपलब्ध राहील. तसेच काही कारणास्तव पूर्वनोंदणी न झाल्यास लसीकरण केंद्रावरदेखील नोंदणीसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर केंद्रावर लसीकरणाचा लाभ घेण्याकरिता संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. पात्र नागरिकांनी नोंदणी करून सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.