...अन् वांद्रे-कुर्ला कोविड केंद्रातील लसीकरण ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:06 AM2021-04-18T04:06:44+5:302021-04-18T04:06:44+5:30
लसीचा तुटवडा, नवीन साठा मिळणार असल्याने आज होणार प्रक्रिया पूर्ववत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो ...
लसीचा तुटवडा, नवीन साठा मिळणार असल्याने आज होणार प्रक्रिया पूर्ववत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड केंद्रात शनिवारी लसींचा तुटवडा भासल्याने लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अचानक झालेल्या लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण ठप्प झाले, परिणामी भर उन्हात लसीकरणासाठी रीघ लावलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा माघारी परतावे लागले. मात्र, रविवारी लसीकरण पूर्ववत होईल अशी माहिती केंद्राच्या अधिष्ठात्यांनी दिली.
मागील काही दिवसांत लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यात शनिवार-रविवारी हा ओघ अधिक असतो. लसीकरणासाठी मागणी तसा पुरवठा नसल्याने अचानक लसीकरण थांबवावे लागले; परंतु लसीचा नवा साठा लवकरच उपलब्ध होणार असून, ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. शहर, उपनगरातील काही खासगी रुग्णालयांतही लसींचा अखेरचा साठा शिल्लक असून, नव्या साठ्याची गरज असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
...................