CoronaVaccine: मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत लसीकरण ठप्प; लसीच्या तुटवड्यामुळे मोहिमेचा खेळखंडोबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:21 AM2021-04-30T06:21:16+5:302021-04-30T06:25:05+5:30

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण लक्षणीय वाढत असताना लसीकरणावर अधिक भर देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. ...

Vaccination halted in many districts of the state including Mumbai | CoronaVaccine: मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत लसीकरण ठप्प; लसीच्या तुटवड्यामुळे मोहिमेचा खेळखंडोबा

CoronaVaccine: मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत लसीकरण ठप्प; लसीच्या तुटवड्यामुळे मोहिमेचा खेळखंडोबा

Next

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचे प्रमाण लक्षणीय वाढत असताना लसीकरणावर अधिक भर देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. लसीकरणासाठी नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला असला तरी, पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाला खीळ बसली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी लसीकरण ठप्प झाले होते.   

मुंबईतही लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. केंद्र सरकारकडून बुधवारी रात्री उशिरा लसीचा साठा उपलब्ध झाल्याने मुंबईत गुरुवारी दुपारनंतर लसीकरण सुरू झाले. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांना व ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे थेट केंद्रावर पोहोचलेल्या अनेकांची निराशा झाली. साठा नसल्याने मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  

राज्यांना आता ४०० रुपयांत मिळणार कोवॅक्सिन 

भारत बायोटेक कंपनीने बनविलेली कोवॅक्सिन या स्वदेशी लसीचा प्रत्येक डोस आता राज्यांना ४०० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. मात्र खुल्या बाजारपेठेत विक्रीसाठी कोवॅक्सिनची याआधी ठरविलेली १२०० रुपये ही किंमत मात्र कायम राहाणार आहे. याआधी राज्यांसाठी कोवॅक्सिनची किंमत ६०० रुपये ठेवण्यात आली होती. मात्र सीरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लसीच्या किंमती कमी केल्यानंतर भारत बायोटेकनेही तशाच प्रकारचा निर्णय घेतला.

दिवसभरात केवळ  २१ हजार लसीकरण

मुंबईत गुरूवारी केवळ २१ हजार जणांना लस देण्यात आली. पालिका, खासगी लसीकरण केंद्रांवर दिवसभर लसीच्या 
तुटवड्यामुळे गोंधळ उडला होता. मुंबईत गेले काही दिवस रोज सरासरी ४५ ते५० हजार जणांचे लसीकरण होत होते. गुरूवारचा आकडा फार कमी राहिला.

मराठवाड्यातही लसीकरणाचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र होते. औरंगाबादेत गुरुवारी दुपारपासून केंद्र बंद होती तर, नांदेड शहरात १६१ जणांनाच लस देण्यात आली. विदर्भात नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती, चंद्रपूर आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये लसीचा अत्यल्प पुरवठा झाल्याने बहुतेक केंद्रांवर लसीकरण ठप्प पडले होते.

Web Title: Vaccination halted in many districts of the state including Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.