Join us

राज्यात मार्च महिन्यात पूर्ण होणार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याला सध्या ९ लाख ६३ हजार काेराेना लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. १६ जानेवारीला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याला सध्या ९ लाख ६३ हजार काेराेना लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात होणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे दोन टप्पे मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सामान्य नागरिकांना लसीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेईपर्यंत सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. आगामी काळात दोन टप्प्यांत आराेग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर ज्येष्ठ व अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांना लस देण्यात येईल. लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यांत आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. दर दिवसाला किमान ४० ते ५० हजार व्यक्तींना लसीचा डोस देण्यात येईल. कोविन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सद्यस्थितीत लस टोचण्यासाठी १७ हजार ७४९ व्हॅक्सीनेटर्स तसेच ७ लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यातील सामान्य जनतेला लसीसाठी सहा महिने वाट पाहावी लागेल. या गटासाठी लस उपलब्ध करताना त्याच्या क्लिनिकल ट्रायल, किंमत, उपलब्ता, पुरवठा-वितरण हे सर्व घटक विचारांत घ्यावे लागतील. सध्या लसीचा वापर हा आपत्कालीन परिस्थितीत घेतलेला निर्णय आहे.

....................................