मुंबई : राज्यात मंगळवारी ३ हजार ३५८ व्या लसीकरण सत्रात २ लाख ७५ हजार ७६९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण १ कोटी २९ लाख ५५ हजार ६०३ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत १० लाख ७५ हजार २९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ५ लाख ५५ हजार ८७४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. ११ लाख ५१ हजार २४७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ३ लाख ८७ हजार ४२० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या ९ लाख २३ हजार ५९१ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ५ लाख ५५ हजार १७९ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात मुंबईत सर्वाधिक लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ही संख्या २० लाख ८० हजार २० इतकी आहे. त्याखालोखाल पुण्यात १८ लाख ५६ हजार ३८०, ठाण्यात ९ लाख ८६ हजार ३४, नागपूरमध्ये ८ लाख ३१ हजार ७१९, नाशिकमध्ये ५ लाख ७७ हजार १९७, अहमदनगरमध्ये ३ लाख ७१ हजार, कोल्हापूरमध्ये ७ लाख ६६ हजार १४० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.