राज्यात १ कोटी ५३ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:07 AM2021-04-30T04:07:52+5:302021-04-30T04:07:52+5:30

मुंबई : राज्यात मंगळवारी ३ हजार ७१८ व्या लसीकरण सत्रात ३ लाख ८८ हजार २४७ लाभार्थ्यांना लस देण्यात ...

Vaccination of more than 1 crore 53 lakh beneficiaries in the state | राज्यात १ कोटी ५३ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

राज्यात १ कोटी ५३ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

Next

मुंबई : राज्यात मंगळवारी ३ हजार ७१८ व्या लसीकरण सत्रात ३ लाख ८८ हजार २४७ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ५३ लाख ३७ हजार ८३२ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आतापर्यंत १० लाख ९९ हजार ४१५ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ६ लाख ९ हजार ७९० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. १२ लाख ७४ हजार ४९२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ४ लाख ५८ हजार ५८६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ६७ लाख १ हजार ९३ लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे.

Web Title: Vaccination of more than 1 crore 53 lakh beneficiaries in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.