राज्यात १ कोटी ८४ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:06 AM2021-05-12T04:06:07+5:302021-05-12T04:06:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सोमवारी २ लाख ९४ हजार ७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ...

Vaccination of more than 1 crore 84 lakh people in the state | राज्यात १ कोटी ८४ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

राज्यात १ कोटी ८४ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सोमवारी २ लाख ९४ हजार ७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ८४ लाख ७ हजार ४६५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.

राज्यात आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक २७ लाख ८२ हजार ६४७ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल, पुण्यात २४ लाख ८७ हजार ६४४, नागपूर ११ लाख १९ हजार ८१२ , ठाणे १४ लाख २३ हजार ४००, तर नाशिकमध्ये ८ लाख ३४ हजार ८१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

राज्यात पहिला डोस घेतलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या ११,३०,७५२, दुसरा डोस घेतलेल्या आराेग्य कर्मचाऱ्यांची संख्या ६,७४,४५४ आहे. तर पहिला डोस घेतलेले फ्रंटलाइन कर्मचारी १५,१८,६००, दुसरा डोस घेतलेले ६,३७,०१३ इतके आहेत. पहिला डोस घेतलेले सामान्य लाभार्थी १,१७,५०,३८८, दुसरा डोस घेतलेले सामान्य लाभार्थी २१,८५,७५,७४० आहेत.

* १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात पुणे पहिल्या स्थानी

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणात पुणे पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत ४२ हजार ७३६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्याखालोखाल ठाण्यात ३८ हजार ९०७, मुंबईत ३१ हजार ८२२, नांदेडमध्ये २१ हजार ३०३, यवतमाळमध्ये १८ हजार ४६६, अमरावती १८ हजार १५० लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. राज्यात आतापर्यंत या वयोगटातील ५ लाख १० हजार ५१८ लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला.

Web Title: Vaccination of more than 1 crore 84 lakh people in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.