राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:05 AM2021-06-11T04:05:48+5:302021-06-11T04:05:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात २ लाख ९७ हजार ७६० नागरिकांनी लस घेतली, तर आतापर्यंत एकूण ...

Vaccination of more than 20 lakh beneficiaries in the age group of 18 to 44 years in the state | राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २० लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात २ लाख ९७ हजार ७६० नागरिकांनी लस घेतली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ५० लाख १५ हजार ६१५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील २० लाख २९४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून, यातील १ लाख १९ हजार ५१० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

राज्यात १२ लाख १४ हजार ७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस, तर ७ लाख ६७ हजार ७२६ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १९ लाख १६ हजार ४४८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ८ लाख १० हजार ६५० फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

याशिवाय, ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ४८ लाख ७५ हजार ६७८ जणांना पहिला, तर ३३ लाख १० हजार ५९५ जणांना दुसरा डोस देण्यात आला. मुंबईत एकूण ३९ लाख ४१ हजार ७८४, नागपूरमध्ये १३ लाख ३६ हजार ३८८, ठाण्यात १९ लाख ११ हजार आणि पुण्यात ३२ लाख ५९ हजार ९३६ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

..........................................

Web Title: Vaccination of more than 20 lakh beneficiaries in the age group of 18 to 44 years in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.