राज्यात २ कोटी ३ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:06 AM2021-05-21T04:06:14+5:302021-05-21T04:06:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात बुधवारी १ लाख १ हजार ९८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ...

Vaccination of more than 23 million people in the state | राज्यात २ कोटी ३ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

राज्यात २ कोटी ३ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात बुधवारी १ लाख १ हजार ९८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ३ लाख ३५ हजार ९९९ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

राज्यात ११ लाख ५१ हजार ५९४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख १४ हजार १६२ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १६ लाख १३ हजार ५२१ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख ३७ हजार ८२८ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील एकूण ६ लाख ६६ हजार १५९ लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी २५ लाख ९३ हजार २८४ लाभार्थ्यांना पहिला, तर २८ लाख ५९ हजार ४५१ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

..........................

Web Title: Vaccination of more than 23 million people in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.