राज्यात २ कोटी ६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:05 AM2021-05-23T04:05:08+5:302021-05-23T04:05:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शुक्रवारी १ लाख २० हजार ७४३ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण ...

Vaccination of more than 26 million people in the state | राज्यात २ कोटी ६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

राज्यात २ कोटी ६ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शुक्रवारी १ लाख २० हजार ७४३ जणांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ६ लाख २४ हजार ९३० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आराेग्य विभागाने दिली.

राज्यात ११ लाख ५६ हजार २४५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख १७ हजार ८२४ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १६ लाख ३७ हजार ४१८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख ४४ हजार ११२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १८ ते ४४ वयोगटातील एकूण ६ लाख ८३ हजार ९३२ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. १ कोटी २७ लाख ७५ हजार १२४ सामान्य नागरिकांना लसीचा पहिला डोस, तर २९ लाख १० हजार २७५ सामान्य नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

मुंबईत आतापर्यंत ३० लाख १ हजार ८७५, पुण्यात २६ लाख ३६ हजार ९१२, ठाणे १५ लाख ५० हजार ३८७, नागपूर १२ लाख ४८ हजार ३१ जणांना लस देण्यात आली.

.................................................

Web Title: Vaccination of more than 26 million people in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.