राज्यात ३३ लाख ६५ हजारांहून अधिक जणांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:06 AM2021-03-18T04:06:50+5:302021-03-18T04:06:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी २ लाख ३२ हजार ३४० जणांचे लसीकरण करण्यात आले. १ लाख ९८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मंगळवारी २ लाख ३२ हजार ३४० जणांचे लसीकरण करण्यात आले. १ लाख ९८ हजार ६६४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड तर ३३ हजार ६७५ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत ३३ लाख ६५ हजार ९५२ जणांचे कोरोना लसीकरण करण्यात आले.
मुंबईत ४२ हजार ५३४ जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण ६ लाख ९० हजार ८७८ जणांना लस देण्यात आली. त्यातील ३७ हजार ३२३ जणांना पहिला तर ५ हजार २११ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण ६ लाख ९० हजार २४४ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात ६ लाख ३ हजार ४३९ जणांना पहिला तर ८६ हजार ८०५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण २ लाख २ हजार ८४३ आरोग्य कर्मचारी, १ लाख ४२ हजार १७७ फ्रंटलाइन वर्कर्स, ३ लाख ३ हजार ७२४ ज्येष्ठ नागरिक तर ४५ ते ५९ या वयाेगटातील गंभीर आजार असलेल्या ४१ हजार ५०० लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
* ठाण्यात २ लाख ६९ हजार ६३२ जणांना लस
मुंबईखालोखाल पुण्यात ३ लाख ७८ हजार ४२८, ठाण्यात २ लाख ६९ हजार ६३२, नागपूरमध्ये १ लाख ९९ हजार १४४ आणि नाशिकमध्ये १ लाख ५९ हजार ५७४ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.