Join us

राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९५ लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात दिवसभरात १ लाख २५ हजार ४६३ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात दिवसभरात १ लाख २५ हजार ४६३ लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ३ कोटी ९५ लाख १३ हजार १७१ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटात ९६ लाख २२ हजार ३२२ जणांना लसीचा पहिला डोस तर, ४ लाख ८ हजार ४९१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १२ लाख ८४ हजार १५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस तर, ८ लाख ८३ हजार २१९ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ लाख ९९ हजार ७३ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर १० लाख ५२ हजार २९७ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ७४ लाख ६५९ जणांना लसीचा पहिला डोस, तर ६७ लाख ५२ हजार ५३ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत ६६ लाख ७७ हजार २०३, पुण्यात ५६ लाख ३७ हजार २६३, ठाण्यात ३० लाख ८५ हजार ३८७, नागपूरमध्ये २१ लाख १० हजार ८४०, तर कोल्हापूरमध्ये १६ लाख २४ हजार ६६९ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.