Join us

राज्यात ८ लाख ३० हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:12 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात गुरुवारी पार पडलेल्या ८४१ लसीकरण सत्रात ४८,००६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गुरुवारी पार पडलेल्या ८४१ लसीकरण सत्रात ४८,००६ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ४०,९३१ लाभार्थ्यांना पहिला व ७,०७५ लाभार्थ्यांना दुसरा डाेस देण्यात आला. १४,६७३ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना व २६,२५८ फ्रंटलाइन कर्मचारी लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच ७,०७५ आरोग्य कर्मचारी लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

४७,०३४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस देण्यात आली. त्यापैकी ४०,१०३ लाभार्थ्यांना पहिला डोस व ६,९३१ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला. ९७२ लाभार्थ्यांना काेव्हॅक्सिन लस देण्यात आली. त्यापैकी, ८२८ लाभार्थ्यांना पहिला डोस व १४४ लाभार्थ्यांना दुसरा डाेस दिला. आजपर्यंत एकूण ८,३०,३४५ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आले.

राज्यात आतापर्यंत २३ हजार ७३२ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेण्यात सर्वांत अग्रक्रमी ठाणे जिल्हा असून या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या २ हजार ५७० आहे,. त्याखालोखाल पुण्यात २ हजार ४६ आणि नागपूरमध्ये १ हजार ५९७ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. राज्यात मुंबईत आतापर्यंत १ लाख ४७ हजार ४३८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली असून, यात ९८ हजार ३८८ आरोग्य कर्मचारी तर ४९ हजार ५० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर, पुण्यात ८० हजार २८५, ठाण्यात ७९ हजार ५७७ आणि नागपूरमध्ये ३७ हजार ६८६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

* सर्वांत कमी लसीकरण

हिंगोली - ५ हजार ९४२, वाशिम - ६ हजार ६३६, सिंधुदुर्ग - ७ हजार ६९६, परभणी - ७ हजार १४६

...................