राज्यात आतापर्यंत ८५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:07 AM2021-04-08T04:07:36+5:302021-04-08T04:07:36+5:30
मुंबई : राज्यात मंगळवारी ४ हजार २३९ व्या लसीकरण सत्रात ३ लाख ८८ हजार ७१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. ...
मुंबई : राज्यात मंगळवारी ४ हजार २३९ व्या लसीकरण सत्रात ३ लाख ८८ हजार ७१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत राज्यात एकूण ८५ लाख ६४ हजार ९०८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत १० लाख ३९ हजार ५८५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ४ लाख ३९ हजार ९१५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ९ लाख १८ हजार ३७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर २ लाख ८६ हजार १७० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या ५७ लाख ५६ हजार १२५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ७१ हजार ७६ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
मुंबईत एकूण १४ लाख ७१ हजार, पुण्यात ११ लाख ७३ हजार ४३७, ठाण्यात ६ लाख ३१ हजार ५०८, नागपूरमध्ये ५ लाख ८० हजार ९२७ आणि नाशिकमध्ये ३ लाख ६५ हजार १०५ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत अजूनही लसीकरणाचा वेग मंद असून यात हिंगोली ४४ हजार ८२२, सिंधुदुर्ग ६० हजार ३५३, वाशिममध्ये ८४ हजार ५८२, परभणीत ७९ हजार ८०५, उस्मानाबादमध्ये ६६ हजार ६६१ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.