मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात २ लाख ७२ हजार ४२१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात एकूण ९६ लाख ३९ हजार ८०६ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत १० लाख ४२ हजार ६०८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ५ लाख ४ हजार ३५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ९ लाख ३० हजार ५३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ३ लाख ७ हजार ५१ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असलेल्या ६७ लाख ३६ हजार ६४० लाभार्थ्यांना पहिला डोस, तर १ लाख १९ हजार ९७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
राज्यात मुंबईत १६ लाख ६ हजार ९४४ लाभार्थ्यांना, पुण्यात १३ लाख १० हजार ५६६, ठाण्यात ७ लाख १९ हजार ३९७, नागपूरमध्ये ६ लाख ८२ हजार ११९, नाशिकमध्ये ४ लाख २८ हजार ४४८ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत २ लाख ५७ हजार ६० आरोग्य कर्मचारी, २ लाख ७६ हजार १९२ फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ ते ५९ वयोगटातील ४ लाख २६ हजार ६२३ आणि ६० हून अधिक वय असलेल्या ६ लाख ५४ हजार ४०३ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.