Join us

राज्यात दिवसभरात साडेनऊ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:09 AM

मुंबई : राज्यात शनिवारी ९ लाख ६४ हजार ४६० जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण ४ ...

मुंबई : राज्यात शनिवारी ९ लाख ६४ हजार ४६० जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. तर आतापर्यंत एकूण ४ कोटी ९१ लाख ९९ हजार ४०१ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात १२ लाख ९१ हजार ४१६ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ९ लाख ४७ हजार ५ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. २१ लाख ३१ हजार ८२८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर १२ लाख ८२ हजार १८० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ८८ लाख ७१ हजार ८३३ जणांना लसीचा पहिला डोस, तर ९४ लाख ३६ हजार २४७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ४० लाख ८९ हजार ७२३ जणांना लसीचा पहिला डोस, तर ११ लाख ४९ हजार १६९ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.