राज्यात दीड लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:07 AM2021-05-07T04:07:04+5:302021-05-07T04:07:04+5:30
मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात २ लाख ५९ हजार ६८५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर १८ ते ४४ ...
मुंबई : राज्यात बुधवारी दिवसभरात २ लाख ५९ हजार ६८५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील एकूण दीड लाखाहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे, या लाभार्थ्यांची संख्या १ लाख ५३ हजार ९६७ इतकी आहे. तर राज्यात एकूण आतापर्यंत १ कोटी ६८ लाख २४ हजार ८१९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत ११ लाख १४ हजार ३८७ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ६ लाख ४५ हजार २८ आऱोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर १४ लाख ४९ हजार ३६२ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस तर ५ लाख ५५ हजार ७८ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांमध्ये आतापर्यंत १ कोटी १३ लाख ९० हजार २२३ लाभार्थ्यांना पहिला डोस तर १६ लाख ७० हजार ७४१ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्हा लाभार्थी
मुंबई २५८६४७५
पुणे २३६५२४६
ठाणे १३३८७३६
नागपूर १०३०४२३
नाशिक ७७२३३४