मुंबईत लसीकरणाने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:10 AM2021-03-13T04:10:27+5:302021-03-13T04:10:27+5:30

राज्यात आतापर्यंत चोवीस लाखांहून अधिकजणांना लस लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात ...

Vaccination in Mumbai crosses Rs 5 lakh mark | मुंबईत लसीकरणाने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

मुंबईत लसीकरणाने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

Next

राज्यात आतापर्यंत चोवीस लाखांहून अधिकजणांना लस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात गुरुवारी ८० हजार ७०५ जणांना लस देण्यात आली. ७९ हजार ७४८ जणांना कोविशिल्ड, तर ९५७ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत २४ लाख ३४ हजार ९६६ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येत होती. १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत दिवसभरात ३६ हजार ९३३ नागरिकांना लस देण्यात आली.

मुंबईत गुरुवारी ३६ हजार ९३३ जणांचे लसीकरण झाले. त्यातील ३२ हजार ५७४ जणांना पहिला, तर ४ हजार ३५९ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण ५ लाख १३ हजार ६८६ जणांना लस देण्यात आली. त्यात ४ लाख ५० हजार ७८१ जणांना पहिला, तर ६२ हजार ९०५ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण १ लाख ८० हजार २३३ आरोग्य कर्मचारी, १ लाख २० हजार ११५ फ्रंटलाइन वर्कर्स, १ लाख ९० हजार २९४ ज्येष्ठ नागरिक, तर ४५ ते ५९ वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या २३ हजार ०४४ जणांना लस देण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आतापर्यंत ३ लाख ५७ हजार १३७ जणांना पहिला, तर ५४ हजार ५२३ जणांना दुसरा अशाप्रकारे एकूण ४ लाख ११ हजार ६६० जणांना लसीकरण करण्यात आले. खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत ८० हजार २२३ जणांना पहिला, तर ६ हजार ५४८ जणांना दुसरा अशाप्रकारे एकूण ८६ हजार ७७१ जणांना लस देण्यात आली.

आतापर्यंतचे मुंबईतील लसीकरण

कर्मचारी - १,८०,२३३

फ्रंटलाईन वर्कर्स - १,२०,११५

ज्येष्ठ नागरिक - १,९०,२९४

४५ ते ५९ वर्षांमधील गंभीर आजार असलेले - २३,०४४

एकूण - ५,१३,६८६

.............................

Web Title: Vaccination in Mumbai crosses Rs 5 lakh mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.